Monday, February 16, 2009

मनाचे श्लोक



\\ श्रीमनाचे श्लोक//


गणाधिश जो ईश सर्वांं गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
गमूं पंथ आनंत या राघवाचा ॥१॥

मना सज्जना भक्तिपंथेंंची जावें।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावेंं ॥
जनीं निंंद्य तेंं सर्व सोडूनि द्यावेंं।
जनीं वंद्य तेंं सर्व भावेंं करावेंं ॥२॥

प्रभाते मनी राम चिंतित जावा।
पुढे वैखरी राम आधींं वदावा॥
सदाचार हा थोर सोडूंं नये तो।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो॥३॥

मना वासना दुष्ट कामा न ये रे।
मना सर्वथा पाप बुद्धि नको रे॥
मना धर्मता नीति सोडूंं नको हो।
मना अंतरी सार वीचार राहो॥४॥

मना पापसंकल्प सोडुनि द्यावा।
मना सत्यसंकल्प जीवींं धरावा॥
मना कल्पना ते नको वीषयाची।
विकारें घडे हो जनीं सर्व ची ची॥५॥

नको रे मना क्रोध हा खेदकारी।
नको रे मना काम नानाविकारी।।
नको रे मना लोभ हा अंगिकारुंं।
नको रे मना मत्सरू दंभ भारु॥६॥

मना श्रेष्ठ धारिष्ट जीवींं धरावेंं।
मना बोलणे नीच सोशीत जावेंं॥
स्वयेंं सर्वदा नम्र वाचे वदावेंं।
मना सर्व लोकांसि रे नीववावेंं ॥७॥

देहे त्यागिता कीर्ति मागेंं उरावी।
मना सज्जना हेची क्रिया धरावी।।
मना चंदना चे परी तवा झिजावेंं।
परी अंतरी सज्जना नीववावेंं।।८॥

नको रे मना द्रव्य ते पुढिलांंचे ।
अति स्वार्थ बुद्धि न रे पाप सांचे॥
घडे भोगणे पाप तेंं कर्म खोटें।
न होतांं मनासारखेंं दुःख मोठेंं॥ ९॥

सदा सर्वदा प्रीति रामीं धरावी।
दुखाची स्वयेंसांडि जीवीं करावीं।।
देहेदुःख तें सूख मानीत जावें।
विवेकें सदा स्वस्वरूपीं भरावे।।१०।।

जनीं सर्व सुखी असा कोण आहे।
विचारें मना तूंची